Mobile Theft : डिलिव्हरी बॉयनेच केली कंपनीत चोरी

एमपीसी न्यूज – कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय (Mobile Theft) म्हणून नोकरी करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून एक लाख 52 हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले. ही घटना दोन ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत तळेगाव दाभाडे स्टेशन येथील इन्स्टाकार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.

ओजस जयेंद्र सानप (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन अशोक पवार वय 29, रा. वडगाव मावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet Crime : पेस्ट कंट्रोलसाठी आलेल्या कामगारांने पळवले दीड लाखांचे दागिने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 15 ऑगस्ट रोजी कंपनीतील वस्तूंची लिस्ट चेक करत होते. त्यावेळी कंपनीतून वेगवेगळ्या कंपनीचे नऊ मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार फिर्यादी यांनी कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये आरोपी डिलिव्हरी बॉय सचिन पवार (Mobile Theft) याने एक लाख 52 हजार 803 रुपये किंमतीचे नऊ मोबाईल फोन चोरून नेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.