Molestation Case Hinjawadi : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने महिलेस मारहाण आणि विनयभंग

एमपीसी न्यूज – मुलाला शिवीगाळ केल्याच्या जाब त्याच्या आईने विचारला (Molestation Case Hinjawadi) असताना तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी दुपारी सुसगाव येथे घडली असून याप्रकरणी 12 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना भगवान पवार, भगवान नाना पवार, लीलाबाई पोपट मोहिते (सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehugaon Crime : कंपनीत पोहोचविण्यासाठी भरून दिलेल्या मालाचा ट्रक चालकाने केला अपहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान याने फिर्यादी (Molestation Case Hinjawadi) यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला. त्याचा राग आल्याने भगवान याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ देखील केली. अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=MEsfxbEdzsQ&t=1s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.