Sangavi: सांगवी, हिंजवडी येथील विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सांगवीतील घटनेप्रकरणी 23 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल बनसोडे आणि अनिल बनसोडे (रा. जगताप वस्ती, पिंपळे-गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकला. कचरा टाकून जात असताना आरोपींनी पाठीमागून येत महिलेचे केस ओढून विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

हिंजवडीतील घटनेप्रकरणी 37 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तुषार बबनराव लांडगे (रा. वाकड)याला अटक केली आहे. फिर्यादी महिलेकडे वाईट नजरेने पाहून आरोपीने तिला मोटारीत जबरदस्तीने बसविले. तसेच तिला असे म्हणत धमकी दिली. याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.