Morwadi : मोरवाडी चौकातील सिग्नलची वेळ वाढविण्याची मागणी

एमपीसी न्यूज  – मोरवाडी (Finolex ) चौकातील  सिग्नलची वेळ ( Morwadi ) वाढविण्याची मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली.

Bhosari : 66 वर्षीय प्रकाश पाटील यांनी केले सायकलवरुन महाराष्ट्र दर्शन, 36 जिल्ह्यांमध्ये 66 दिवसांचा केला प्रवास

मोरवाडी येथील अतिशय वर्दळीचा असलेल्या चौकात वाहनांची वर्दळ अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. या चौका लगत महानगर पालिकेचे भवन, मेट्रो स्टेशन, व्यापारी संकुल व बँक यांसारख्या आस्थापना आहेत.

मुख्यतः हा रस्ता मुंबई-पुणे महामार्ग असून येथे भरपूर प्रमाणात वर्दळ असून तेथे सतत ट्राफिक होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

पादचाऱ्यांना ही रस्ता क्रॉस करण्यास अडथळा होत असतो. चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तेथील सिग्नलची निर्धारित वेळ वाढविणे गरजेचे आहे.

आपल्या आस्थापनेकडून सदर चौकातील सिग्नलची वेळ वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. हा प्रश्न मार्गी लागताच वाहतूक कोंडीचा नागरिकांना होणार त्रास दूर होणार आहे ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ( Morwadi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.