Moshi : सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्याने ढाब्याला आग

एमपीसी न्यूज – सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्याने ढाब्याला आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी साडेचारच्या सुमारास मोशी येथील चौधरी ढाबा येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सागर बोराटे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली की, मोशी येथील नवीन बीआरटी मोशी-आळंदी मार्गावर असलेल्या चौधरी ढाब्याला आग लागली. त्यानुसार अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
ढाब्यामध्ये असलेल्या गॅस सिलेंडरला आग असल्याने जवानांनी तात्काळ सिलेंडरची आग आटोक्यात आणली. वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. पेटलेल्या गॅस सिलेंडरजवळ आणखी दोन सिलेंडर होते. पेटलेल्या सिलेंडरला सुरक्षित ठिकाणी नेऊन आग विझवण्यात आली. सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने ही आग लागल्याचे निष्पन्न झाले. या आगीमध्ये हॉटेलमधील फ्रीज, ग्रँडर, खाद्यपदार्थ व इलेक्ट्रिक वायर जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाचे सब ऑफिसर शांताराम काटे, कैलास डोंगरे, विठ्ठल घुसे, जालिंदर जाधव, सूर्यकांत पाटील, भरत फाळके, रुपेश जाधव, अनिल माने आदींनी ही आग आटोक्यात आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.