Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या (Moshi) गळ्यातील मंगळसूत्र दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजताच सुमारास मोशी टोलनाक्याजवळ घडली.

याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dapodi – Khadki Station : दापोडी– खडकी स्टेशनच्या दरम्यान असलेले रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी चार दिवस बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांचा भाऊ आणि भाची सोबत (Moshi) मोशी टोल नाक्याजवळून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.