PCMC News : स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची तयारी; सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला असून शहराला देशात अव्वल स्थानावर आणण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सफाई कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत असतात. (PCMC News) त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामकाजाचे स्वरूप आणि जबाबदारी याबद्दल माहिती देऊन कार्यक्षमता वाढविण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी या कर्मचा-यांना त्याबद्दल माहिती देऊन त्यांची नोंदणी देखील यावेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत 4 ठिकाणी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. आहे. पहिल्या टप्प्यात दि. 16, 17, 24 आणि 28 नोव्हेंबरला 2 क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सफाई कर्मचा-यांचे एकत्रितपणे त्या भागातील महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये प्रशिक्षण सत्र पार पडणार आहे.

बुधवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये  अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई  कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. गुरुवार दि. 17 नोव्हेंबर रोजी ड व ह क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले आहे.(PCMC News) भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवार दि. 24 नोव्हेंबर रोजी इ व फ  क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे तर सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात क आणि ग  क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडणार आहे.

Woman Harassment: पती व सासऱ्याच्या छळानंतर पीडित विवाहितेची पोलिसात धाव

दुसऱ्या टप्प्यात दि. 7, 12, 14 आणि 27 डिसेंबरला 2 क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिनस्त असलेल्या सफाई कर्मचा-यांचे एकत्रितपणे त्या भागातील महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये प्रशिक्षण सत्र पार पडणार आहे.  बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये  अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई  कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे.(PCMC News) सोमवार दि. 12 डिसेंबर रोजी संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात क आणि ग  क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी, बुधवार दि. 14 डिसेंबर रोजी ड व ह क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. तर भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात इ व फ  क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंगळवार दि. 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हे प्रशिक्षण पार पडणार आहे.  हे प्रशिक्षण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी आणि संबधित क्षेत्रीय अधिकारी नियोजन करत आहेत.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन होईल. स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक हे या प्रशिक्षणाबाबत माहिती देतील.(PCMC News) तदनंतर आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांचे मनोगत होईल. महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मनोगतानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह उपस्थित कर्मचा-यांना मार्गदर्शन करतील. या प्रशिक्षणादरम्यान शून्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यपद्धतीच्या मानक प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.