Moshi : दुकानदार महिलेला धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज- एका व्यावसायिक महिलेला दुकान चालवायचे असेल तर माझ्याशी  संबंध ठेवावे लागतील अशी धमकी दिल्याप्रकरणी (Moshi) पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या दुकानाजवळ बुधवारी(दि.26) सकाळी घडला.

 पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष शरीरावर शिंदे (रा.मोशी) याला अटक केली आहे.

Nigdi : अन् पोलीस आयुक्त पोहोचले ‘ऑन द स्पॉट’

 पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपीने फिर्यादीचा घरापासून दुकानापर्यंत पाठलाग केला. फिर्यादी या दुकानात गेल्या असता तोही दुकानात घुसला. त्याने  फिर्यादी यांच्या कामगारांसमोर  तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुला दुकान चालवू देणार नाही अशी  धमकी दिली.

तसेच फिर्यादीचा हात पकडून त्यांना जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या कामगार महिलेने आरडाओरड केली असता शेजारील दुकानातील दुकानदार मदतीला आले.  गर्दी पाहून आरोपी तिथून पळून गेला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने फिर्यादीच्या घरी जात त्यांच्या पतीला ही धमकी दिली यावरून भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Moshi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.