Moshi : कालपासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : मोशीमध्ये (Moshi) कालपासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह बनकर वस्तीमध्ये सापडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pimple Gurav : घरात अडकलेल्या अडीच वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटका

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार या मुलाचे नाव सुमित बनसोडे असे होते. काल सकाळपासून तो बेपत्ता (Moshi) होता. तसेच तो मोशीमधील बनकर वस्तीमध्येच राहत होता. त्याचा खून झाला, कि आत्महत्या हे पोलिसांच्या पुढील तपासात उघडकीस येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.