Pimple Gurav : घरात अडकलेल्या अडीच वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटका

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimple Gurav) अग्निशमन विभागाने पिंपळे गुरव मधील घरात अडकलेल्या अडीच वर्षांच्या मुलाची सुखरूप सुटका केली. आज सकाळी ही घटना घडली.

याबाबत प्रतीक मुथय्या यांनी अग्निशमन विभागास सकाळी कळवले. त्यांनी सांगितले, की, ते राहत असलेल्या मोरया पार्कमधील बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एक लहान मुलगा अडकला होता. त्यानंतर पिंपरी व राहटणी अग्निशमन केंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास सुरुवात केली. याद्विक सोनवणे असे त्या मुलाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी अधिक माहिती देताना म्हंटले, की, “मी कामानिमित्त सोमवार ते शुक्रवार मुंबईला असतो. घरी माझी पत्नी अर्चना व आमची मुले अंसिका व याद्विक असतात.

Chain Link Fencing: नाले तुंबण्याचे प्रकार टाळण्यासाठी ‘चेन लिंक फेन्सिंग’

अंशिका हिचे वय 7 वर्षे असून ती इयत्ता दुसरीत (Pimple Gurav) शिकत आहे. मुलगा याद्विकचे वय 2.5 वर्ष आहे. रोजप्रमाणे अर्चना या अंशिकाला शाळेत सोडण्यासाठी खाली गेल्या होत्या अनावधानाने दरवाजा लॉक झाला. ते पुढे म्हणाले की, याद्विक हा तेव्हा झोपला होता. 10 मिनिटानंतर परत आल्यावर दरवाजा उघडला नाही. कारण तिच्याकडे चावी नव्हती. चावी बनवणाऱ्यास बोलावले पण तो म्हणाला की चावी बनवता येणार नाही. दरवाजा तोडून उघडावा लागेल.

आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे मुथाय्या यांनी अग्निशमन विभागास कळवले व त्यांचे कर्मचारी लगेच आले. त्यांनी शिडी लावून गॅलरीमध्ये पोहचून व तेथील उघड्या दरवाजाने घरात गेले. नंतर त्यांनी मुख्य दरवाज्याचा आतील लॉकउघडला व अर्चना आत गेली. सुदैवाने गॅलरीला ग्रिल नव्हती व तेथील दरवाजाही उघडा असल्याने अग्निशमन कर्मचारी लगेच आत पोहचू शकले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.