Chikhali News: घरकुलमधील मतदारांची फेर नोंदणी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – चिखली घरकुल (Chikhali News) वसाहतीमधील मतदारांची फेर नोंदणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी केली आहे.

चिखली येथील घरकुल प्रकल्पात गेली आठ वर्षे  लोक राहायला आले आहेत. परंतु, येथील मतदान नोंदणी जाणीवपूर्वक केली जात नाही. नवीन झालेल्या प्रभाग क्रमांक 12 मधे घरकुल मधील जरे  एन्टरप्रायझेस या पत्यावरील मतदार नावे ही शेजारच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या वसाहतीतीत  सुमारे वीस हजार नागरिक रहात आहेत.

Pimple Gurav : घरात अडकलेल्या अडीज वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटका

येथे एक गठ्ठा नोंदणी होऊ नये,मतदारांची विभागणी व्हावी,यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मगर यांनी (Chikhali News) केला आहे. याबाबतीत  वारंवार निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवदने दिलेली आहेत. नवीन मतदान नोंदणी आँनलाईन केली. पेपर दिला तरी मतदान 33, 13, 14, 15 प्रभागामध्ये गेले आहे. सुमारे 2000 हुन जास्त मतदारांची नावे प्रभाग क्र 12 मध्ये नाहीत. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण घरकुलमध्ये फेरमतदार नोंदणी करावी.  घरकुल मधील मतदार नोंदणीपासून वंचित होत आहेत. त्यामुळे प्रभागाबाहेर  मतदान केले जाणार नाही,अशी भूमिका घेण्यात येईल, असे मगर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.