Murder News : तंबाखूसाठी पैसे न दिल्याने आईचा खून; पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील शिरोली आळे या गावात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तंबाखू साठी पैसे न दिल्याने एका तरुणाने स्वतःच्या आईचाच खून (Mother killed for not paying for tobacco) केला. आईच्या डोक्यात खोऱ्याने वार करत आरोपी तरुणाने ठार मारले. पोलिसांनी या मारेकरी मुलास अटक केली आहे.

अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी अमोल बारकु खिल्लारी (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बारकू सखाराम खिलारी (वय ६६) यांनी दिली.

Kartiki Yatra : आळंदीमधील लाखो भाविकांच्या सोयी सुविधेकरीता असणाऱ्या दर्शनबारीचे काम अखेर सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान घरात कोणी नसताना आरोपी अमोलने आईकडे तंबाखूसाठी पैशाची मागणी केली. त्यावेळी आईने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. अमोलने मी घर सोडून जाईन अशी आईला धमकी दिली. त्यावेळेला आईने तुला कुठे जायचे तिकडे जा, असे म्हटल्यावर रागात येऊन अमोलने घरातील खोरे आईच्या डोक्यात घालून तिचा खून केला. घटनेचा तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.