Pune News : पुण्यात नदी संवर्धनासाठी साखळी उपोषणानंतर आज मुकमोर्चा

एमपीसी न्यूज – नदी संवर्धनासाठी केलेल्या साखळी उपोषणाला 200 दिवस पूर्ण झाल्याने बुधवारी दुपारी चार वाजता गरवारे महाविद्यालय ते पुणे महापालिका भवन असा मुक मोर्चा नदी प्रेमी काढणार आहेत.

सांडपाणी व राडारोडा टाकून पुण्यातील मुळा-मुठा यांची गटारगंगा झाली आहे. त्याचा फटका रविवारी (दि.11) झालेल्या मुसळधार पावसातही पुणेकरांना बसला आहे. नदी विकासाच्या नावाखाली नद्यांचे होणारे काँक्रीटीकरण,त्यात सोडले जाणारे सांडपाणी, कचरा याविरोधात नदी प्रेमींनी साखळी उपोषण सुरु केले होते. त्या उपोषणाला 200 दिवस पूर्ण झाले. तरी महापालिका प्रशासनाला जाग आली नाही म्हणून हा मुक मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे.

आपली नदी स्वच्छ व सुंदर रहावी यासाठी पुणेकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.गरवारे महाविद्यालयापासून निघून हा मुकमोर्चा सायंकाळी पाच वाजता महापालिका भवन येथे पोहचेल. तेथे मोर्चाची सांगता होणार आहे. यावेळी अनेक पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था यात सहभागी होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.