Mulshi Dam Earthquake : मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत

लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची जीएसआयला सूचना

एमपीसी न्यूज : मुळशी तालुक्यातील (Mulshi Dam Earthquake) लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआय) सर्वेक्षण करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान मुळशी धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नसून अतिशय कमी तीव्रतेची असल्याची माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.

CM Eknath Shinde : थेट दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 12 खासदारांसोबत शक्तिप्रदर्शन

टाटा पॉवरने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाल्याबाबत प्रथमदर्शनी कळवले होते. तथापि, नोंद झालेली कंपने ही भूकंपाची नसून 40-42 किमी परिघामधील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरुपाच्या आघातजनक घटनांमुळे झाले असल्याचा अंदाज आहे. नोंद झालेली (Mulshi Dam Earthquake) कंपने अतिशय कमी तीव्रतेची (0.2 जी) असल्याचे दिसून आले, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. त्यामुळे लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे जीएसआयला कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.