CM Eknath Shinde : थेट दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 12 खासदारांसोबत शक्तिप्रदर्शन

एमपीसी न्यूज : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला (CM Eknath Shinde) धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 बंडखोर खासदारांनी पाठींबा दिला आहे. थेट दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 खासदारांना घेऊन पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाला एकार्थी शक्तीप्रदर्शन दाखवले. या पत्रकार परिषदेआधी 12 खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांनी बैठक देखील घेतली.

तसेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांनी शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. एवढेच नव्हे तर गटनेता बदलावा यासाठी मागणीचे पत्र देखील बिर्ला यांना दिले. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केले. आणि भावना गवळी यांचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद म्हणून उल्लेख केला असून पत्रात खासदार राहुल शेवाळे यांचा गटनेता म्हणून उल्लेख केल्याने आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात खळबळ माजली आहे.

MP Shrirang Barne : शिवसेनेला धक्का! खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात; निवासस्थानाबाहेर बंदोबस्त

हे 12 खासदार शिंदे गटात – CM Eknath Shinde

श्रीकांत शिंदे
राहुल शेवाळे
भावना गवळी
श्रीरंग बारणे
धैर्यशील माने
हेमंत गोडसे
संजय मांडलिक
राजेंद्र गावित
सदाशिव लोखंडे
प्रताप जाधव
कृपाल तुमाणे
हेमंत पाटील

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.