Operation Theatre Pimpri : नवीन जिजामाता, थेरगाव रुग्णालयात सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार करणार

एमपीसी न्यूज –  नवीन जिजामाता आणि नवीन थेरगाव रुग्णालयात (Operation Theatre Pimpri) सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार करण्यासह स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 21 कोटी 46 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन विभाग इमारतीच्या दुस-या मजल्यावर लाईट हाउस प्रकल्पाकरीता आवश्यक स्थापत्य विषयक कामे करणे आदी विषयांचा समावेश होता.  महापालिकेच्या कायदा विभागाकडील ‘विधी अधिकारी’ या अभिनामाचे पद एकत्रित मानधनावर हंगामी स्वरुपात सहा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. त्याकामी येणा-या खर्चास बैठकीत मान्यता दिली. महापालिकेच्या आकूर्डी गुरुद्वारा चौकापासून ते राजयोग कॉलनी पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामी 7 कोटी 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Pcmc Election 2022: मतदार यादीमध्ये प्रचंड चुका, अंतिम करण्यासाठी मुदतवाढ द्या; विलास मडिगेरी यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

दिघी येथील बी.ई.जी. हद्दीमध्ये (Operation Theatre Pimpri) महापालिकेमार्फत 50 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे 2 वर्षांसाठी देखभाल आणि संरक्षण करण्याकामी वनविकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. यासाठी येणा-या 1 कोटी 96 लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रस्तावित मोशी उप- अग्निशमन केंद्र येथे अग्निशमन संबंधित विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 73 लाख रुपये खर्चास तसेच विविध इमारतींमधील फायर अलार्म व फायर फायटिंग यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्तीकामी येणाऱ्या 50 लाख रुपये खर्च होणार आहे. महापालिका हद्दीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन्स उभारण्यात येत आहे. यासाठी आवश्यक मशिनरी आणि विद्युत विषयक कामे करण्यासाठी 9 कोटी 38 लाख रुपये खर्चास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.