Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन

एमपीसी न्यूज  : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील (Mumbai) अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकर, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.

Pune : डॉ.अरुण किनरे यांच्या आजारांशी दिलेल्या झुंजीचा रोमांचकारी प्रवासाचा उलगडला

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात (Mumbai) शहीद झालेल्या 15 पोलीस अधिकारी, 173 पोलीस जवानांच्या माहितीच्या संदेशाचे वाचन करून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शहिदांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.

यावेळी पोलीस महासंचालक शेठ, आयुक्त फणसळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, प्रमुख अतिथी यांनीही शहिदांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर, संतोष कालापहाड यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.