Chikhali : रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला अडवून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला (Chikhali) तिघांनी अडवून मारहाण करत लुटले. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे घडली.

जुम्मन किताबुल्ला शहा (वय 41, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी (Chikhali)याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदिल बालाजी गवळी (वय 19, रा. घरकुल, चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुम्मन हे 19 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मेसमध्ये जेवण करण्यासाठी जात होते. मात्र मेस बंद असल्याने ते न जेवता पायी चालत त्यांच्या रूमकडे जात होते. संविधान चौकात आले असताना तीन मुलांनी त्यांना अडवले. त्या मुलांनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण करत लुटले. चाकुसारख्या हत्याराने जुम्मन यांच्या पोटावर, छातीवर वार करून त्यांना जखमी केले.

जुम्मन यांच्या खिशातून 1500 रुपये रोख रक्कम काढून तिन्ही मुले पळून गेली. पोलिसांनी आदिल गवळी याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.