World Cup 2023: भारतीय संघापुढे 274 धावांचे आव्हान

एमपीसीन्यूज:(विवेक दि. कुलकर्णी)संघात पुनरागमन करताना भारतीय संघातला (World Cup 2023) अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मदशमीने आज जबरदस्त गोलंदाजी करत वर्ल्डकप मधली सर्वोत्तम कामगिरी करताना 54 धावात 5 गडी बाद केले,ज्यामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला 273 धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे.

जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचे ज्या सामन्याकडे लक्ष लागून राहिले होते, (World Cup 2023)त्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातल्या सामन्यात एक वेळ न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करत होता, पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाची मजल 273 धावांपर्यन्तच पोहचली.त्यामुळेच भारतीय संघाने अर्धी बाजी जिंकण्यात यश मिळवले आहे आता उरलेली अर्धी बाजी जिंकण्याची जबाबदारी फलंदाजांवर असेल.

Maval : नागरिकांच्या सतर्कतेमुळे घर सोडून निघालेला मुलगा सुखरूप घरी परतला

आज रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शार्दुल ठाकूर आणि जायबंदी पंड्या ऐवजी मोहम्मद शमी आणि सुर्यकुमारला संघात स्थान मिळाले.

न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली होती,मोहम्मद सिराजने,कॉंवेला शून्यावर बाद केले तर,शमीने यंग 17 धावावंर बाद करुन न्यूझीलंड संघाची अवस्था दोन बाद 19 अशी केली, पण यानंतर रचीन रवींद्रन आणि मिशेल जोडीने जबरदस्त खेळी करत केलेल्या शानदार भागीदारीमुळे न्यूझीलंड संघाने सामन्यात पुनरागमन केले,यावेळी त्यांना नशिबानेही साथ दिली,जडेजा सारख्या निष्णात क्षेत्ररक्षकाकडुन जीवदान मिळाल्यानंतर या जोडीने त्याचा पुरेपूर फायदा उठवला.

 

दोघेही शतकाकडे वाटचाल करत आहेत असे वाटत असतानाच शमीने रवींद्रनला बाद करुन जोडी फोडली, पण मिशेलने मात्र सुंदर फलंदाजी करत आपले विश्वकप स्पर्धेतले पहिले शतक पुर्ण केले,तो संघाला 300च्या पुढे घेवून जाईल असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला 273 धावांवरच रोखून ठेवले.

न्यूझीलंड संघाकडून मिषेलने सर्वाधिक 130 तर रवींद्रनने75 धावा केल्या तर भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने 5 तर,कुलदीप यादव आणि सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

एकूणच न्यूझीलंड संघाची गोलंदाजी आणि भारतीय संघाची भरात असलेली फलंदाजी बघता हे आव्हान आणि हा सामना नक्कीच रंगतदार ठरेल असे वाटत आहे,आपल्याला काय वाटते?

Vivek Kulkarni

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.