Chakan : खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली पाच लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – खासगी व्हिडीओ असल्याचे सांगून ते व्हायरल (Chakan) करण्याची धमकी देत तरुणाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली.

मिथुन सोपान मुंगसे (वय 36, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दर्शन रवींद्र मेदनकर (वय 21, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला अडवून मारहाण करत लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिथुन (Chakan)याने फिर्यादी यांना मेसेज करून त्याच्याकडे फिर्यादीचे खासगी व्हिडीओ असल्याचे सांगितले. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने मिथुन याने फिर्यादीस संपवून टाकण्याची धमकी दिली. व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत फिर्यादीकडून जबरदस्तीने दोन वेगवेगळ्या युपीआय आयडीवर 14 हजार रुपये घेतले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.