Wakad : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्यास अटक; 40 लाख रोकड जप्त

एमपीसी न्यूज – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट (Wakad )सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेल्या बुकीकडून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 21) काळेवाडी येथे करण्यात आली.

दिनेश हरीश शर्मा (वय 38, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Wakad)काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली की, निरंकारी भवन जवळ, काळेवाडी येथे एकजण क्रिकेट लाईव्ह लाईन इन या सोशल मिडिया अॅपद्वारे बेटिंग घेत आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दिनेश शर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 लाख रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि एक कल्क्युलेअर असा एकूण 40 लाख 80 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

World Cup 2023: भारतीय संघापुढे 274 धावांचे आव्हान

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यात इंग्लंड जिंकले एक रुपयाला 60 पैसे आणि दक्षिण आफ्रिका जिंकले तर एक रुपयाला 61 पैसे असा सुरुवातीचा भाव ठरलेला असतो. सामना सुरु झाल्यानंतर या भावात बदल होतो.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार पोपट हुलगे यांनी केली

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.