Mumbai : ‘रेड झोन’ बाहेरील जिल्ह्यात उद्योगांना उत्पादन सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना : उद्योगमंत्री देसाई

एमपीसी न्यूज – रुग्ण संख्येनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार मुंबई, पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृती समितीची आज सोमवारी मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

राज्यातील 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्यातरी या जिल्ह्यातील उद्योगधंदे सुरू न करण्याचा विचार सुरू आहे.

ऑरेंज व ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये उद्योगधंदे सुरू करता येऊ शकतात का, याबद्दल चर्चा सुरू आहे. विशेषत: शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल. कायमस्वरुपी तसेच कंत्राटी कामगारांना काही प्रमाणात उत्पन्न मिळावे, हा दृष्टीकोन प्राधान्याने पुढे ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.