Mumbai: वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकलेले 4 हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

More than 4,000 citizens stranded abroad in Maharashtra under Vande Bharat Abhiyan

जून अखेरपर्यंत 38 फ्लाइर्टसचे नियोजन; मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर फ्लाईटसची व्यवस्था

एमपीसी न्यूज – वंदे भारत अभियानांतर्गत  30 फ्लाईटसने 19 देशातील 4013 नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले असून सर्वांना कॉरंटाईन करण्यात येत आहे. आलेल्या नागरिकांमध्ये 1309 नागरिक मुंबईचे आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1691 इतकी आहे. तर, इतर राज्यातील प्रवासी 1013 इतके आहेत.

हे नागरिक ब्रिटन,  सिंगापूर, फिलीपाईन्स,  अमेरिका, बांगलादेश,  मले‍शिया,  कुवेत, इथियोपिया,  अफगानिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रीका,  इंडोनेशिया, नेदरलँड,  जपान, श्रीलंका,  म्यानमार,  टांझानिया, स्पेन,  आर्यलँड  या देशातून आले आहेत.

 अतिरिक्त 38 फ्लाइर्टसचे नियोजन 

वंदे भारत अभियान टप्पा 3 अंतर्गत एअर इंडियाने 30 जून 2020 पर्यंत 38 फ्लाईटसचे नियोजन केले असून या मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर फ्लाईटसची ही व्यवस्था करण्यात आली आहे.  ज्यात अमेरिका, रशिया, मध्य आशिया, युरोप आणि आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या उड्डाणांचा समावेश आहे.

 दोहा येथून पुढील सात दिवसात 3 चार्टर विमानांच्या सहाय्याने खाडीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल. ऑस्ट्रेलियासाठी वंदेभारत अभियानांतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याबाबत विदेश मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली आहे.

 आलेल्या प्रवाशांचे क्वारंटाईन 

बृहन्मुंबईतील प्रवासी यांचेसाठी इन्स्टिटयुशनल कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्स मध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्हयातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर मार्फत करण्यात येत आहे.  त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.