Pune : कोरोनाच्या 157 रुग्णांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू, 176 नवे रुग्ण

157 patients discharged from the corona, 11 died, 176 new patients

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 157 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 पुरुष, 4 महिला आणि एका 23 वर्षांच्या युवकाचा समावेश आहे. दिवसभरात 176 नवे रुग्ण आढळले.

पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 361 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे एकूण 7 हजार 265 रुग्ण असून, 4 हजार 505 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 2 हजार 399 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

यामध्ये 176 रुग्ण क्रिटिकल असून 40 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पापळ वस्तीमधील 67 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, गुंजन टॉकीज जवळील 55 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 70 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 67 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

तसेच येरवड्यातील 61 वर्षीय पुरुषाचा व 23 वर्षीय तरुणाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातीलचा अन्य 53 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शन भागातील 57 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 61 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 99 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, नाना पेठेतील 72 वर्षीय महिलेचा कोथरूडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. शहरात आता 7 हजार 265 कोरोनाचे रुग्ण झाले असून, 361 नागरिक दगावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.