Mumbai News: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांसह 10 ते 12 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.