Mumbai News : शिवसेना आमदार सरनाईक यांच्या घरी सापडले पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड

एमपीसी न्यूज – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. त्यात आमदार सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडले. या क्रेडिट कार्डवर सरनाईक यांच्या घरचा पत्ता आहे. ईडीच्या चौकशीत आठवडाभरानंतर ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

मागच्या महिन्यात आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला. सरनाईक यांच्या मुंबई आणि ठाणे येथील 10 ठिकाणच्या मालमत्तांवर छापा टाकला. पैशांचा गैर व्यवहाराच्या संशयावरून ईडीने आमदार सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता.

सरनाईक हे विहांग ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आहेत. तसेच ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचा मोठा राबता आहे. ठाण्यातील ताकदवर नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. सरनाईक हे पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक आहेत. ते ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

कंगनाचा शिवसेनेवर पलटवार

अभिनेत्री कंगना रनौत हिने या प्रकरणावरून शिवसेनेला ट्विटरवर टोला लगावला आहे. ‘इंडिया पाकिस्तान ना बन जाये, संभालो यारो’ असे कंगनाने आपल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे.

कंगना ट्विटर लिंक –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.