Pune Traffic News: गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी महापालिकेचा वाहतूक विभागाला प्रस्ताव

एमपीसी न्यूज : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात अवजड वाहनांना अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांना दिला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसते आहे.

Green belt : ग्रीन बेल्ट मधील बांधकाम FSI  संदर्भात अभिप्राय मागवला

वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक विभागाचे उप आयुक्तांना तसा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबतचे पत्र महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आले आहे. अवजड वाहनांमुळेच वाहतूक कोंडी होत आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून या पत्रात करण्यात आला आहे.

अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.