Libero society : लिबेरो सोसायटीतील अडलेला रस्ता केला दुरुस्त

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासुन मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारजे माळवाडीतील लिबेरो सोसायटी येथील सिमाभिंत पडुन नुकसान झाले होते.(Libero society) त्यामुळे सोसायटी मधील नागरीकांना नाहक त्रास सोसावा लागत होता. सोसायटीतील नागरीकांनी संपर्क साधला असता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातुन सदर कोसळलेला भाग,अडलेला रस्ता मोकळा करुन देण्यात आला, अशी माहिती माजी नगरसेवक किरण अरविंद बारटक्के यांनी दिली.

Pune Traffic News: गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी महापालिकेचा वाहतूक विभागाला प्रस्ताव

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वारजे – माळवाडी परिसरात (Libero society) पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातून रस्ता पार करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.