Express Way Traffic : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

एमपीसी न्यूज : सध्या शाळांना सुट्ट्या सुरू झाल्या आहेत.(Express Way Traffic) त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या काही दिवसापासून सतत वाहतूक कोंडी होत आहे. या सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पोलिसांनी तोडगा काढला आहे. 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा वर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो.(Express Way Traffic) त्यामुळे आता चारचाकी वाहनांची संख्या द्रुतगती महामार्गावर वाढली की अवजड वाहनांना गोल्डन अवर्स सुरू करण्याचा निर्णय आता पोलिसांनी घेतला आहे.

Pimpri : ​रामकथा जाणण्यासाठी वाल्मिकी रामायण हेच प्रमाण ग्रंथ – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

अवजड वाहनांना रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत सदरची वाहने त्या दिशेने प्रवास करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवली जात आहेत.

वाहतूक कोंडी फोडण्याकरिता गोल्डन अवर्स करून अवजड वाहनाचे प्रमाण घाटामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच हलक्या वाहनांचे प्रमाण जास्त होताच ब्लॉक (Express Way Traffic) घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न बोरघाट पोलिस वाहतूक केंद्राकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.