Pune : सप्तसूरांनी रंगला ‘सूर नवा, ध्यास नवा’

एमपीसी न्यूज-  नवीन आणि जुन्या गाण्याचे अप्रतिम सादरीकरण करीत नवोदित गायक आणि वादकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात रंग भरला. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी मनिषा निश्चल महक प्रस्तूत ‘लव्ह यू जिंदगी’मधून सप्तसुरांची बरसात केली.

महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शरयू दाते यांनी महात्मा गांधी यांच्या ‘वैष्ण जन तो, तेने कहिये’ या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल’ या गाण्याने गायकांनी महात्मा गांधी यांच्या कार्याला सलाम केला. नटरंग चित्रपटातील ‘खेळ मांडला’ हे गाणे आणि संघर्षयात्रा या चित्रपटातील पोवाडयाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. मनिषा निश्चल यांनी ‘लंबी जुदाई’ या गाण्याने जुन्या काळाला उजाळा दिला. ‘कधी तू रिमझिम झरणारी बससात’, ‘मितवा’ या गाण्यांवर रसिकांना गायकांनी ताल धरायला लावला तर ‘दिलबर दिलबर’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’ आणि ‘टिक टिक वाजते डोक्यात’ या गाण्यांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ देत टाळया आणि शिटयांच्या रुपात भरभरुन दाद दिली.

कार्यक्रमाचे निर्माते मनिषा निश्चल आणि निश्चल लताड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रशांत क्षीरसागर, कुणाल जाधव, शब्बीर भाई, अ‍ॅड चंद्रशेखर पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. अनिरुध्द जोशी, शरयू दाते, जितंद्र तुपे, जयदीप बागवाडकर, मनिषा निश्चल यांच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमृता केदार, विशाल थेलकर, लिजेश शशीधरन, निलेश देशपांडे, रोहन वनगे, विशाल गंडतवार, ऋतूराज कोरे यांनी साथसंगत केली. पायत गीत आणि दीपक सक्सेना यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.