BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : फसवून लग्न केल्या प्रकरणी पत्नीसह नातेवाईकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्वीचा पती हयात असताना संगनमताने फसवून दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून देत दागिन्यांचा अपहार, धमकावून खंडणी मागणाऱ्या व बदनामी करणाऱ्या पत्नीसह तिचे आई-वडिल, भावसाह अन्य दोघांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश मगर (वय २९, चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी मोहिनी मगर, वडील नंदकुमार गायकवाड, आई आशू गायकवाड, भाऊ ओंकार गायकवाड (रा.सर्वजण सिंहगड रोड, धायरी फाटा, वडगाव बुद्रुक), यांच्यासह अभिमन्यू पांचाळ, लक्ष्मण दळवी (दोघांचा पत्ता समजू शकला नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शेवाळे यांनी अधिक माहिती दिली, आरोपींनी मुलीचे पूर्वीही लग्न झाल्याची माहिती लपवत फिर्यादी योगेश मगर यांच्याशी तिचे गेल्या वर्षी २४ एप्रिल रोजी लग्न लावून दिले. लग्नानंतर विश्वास संपादन करीत तिने घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. या सर्वांचा जाब विचारायला गेलेल्या पतीची सासरे नंदकुमार गायकवाड यांनी नातेवाईकांमध्ये बदनामी केली. वेळोवेळी धमक्या दिल्या. तसेच मुलीला नांदवायचे नसेल तर मला २० लाख रुपये दे. मी वकील आहे तुला १० वर्षे अडकवून ठेवीन, खडी फोडायला पाठवीन, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली.

लक्ष्मण दळवी नावाच्या इसमाने फिर्यादीला फोन करून शिवीगाळ केली तुला बघून घेतो, अशी धमकी देत फिर्यादीला म्यूच्युअल घटस्फोटाची मागणी करीत असताना त्यांना घटस्फोट न देता या सर्वांनी अडवणूक करून संगनमताने मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याचा गैरवापर

यातील आरोपी पत्नीचे आक्षेपार्य फोटो फिर्यादीने तिच्या लॅपटॉपमध्ये पाहिले याबाबत फिर्यादीने जाब विचारताच ती माहेरी निघून गेली आणि कायद्याचा गैरवापर करून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने बनाव करीत आई वडिलांसह पुण्यातील एक पोलीस ठाणे गाठून चांदींची भांडी व लॅपटॉप मागून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. मात्र, फिर्यादी यांनी कोर्टाचा दरवाजा ठोटावत १५६/(३) नुसार कोर्टातून या गुन्ह्याविरुद्ध आदेश मिळविल्यानंतर कोर्टाच्या आदेशान्वये चिंचवड पोलिसांनी अखेर हा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी महिलेचा पहिला पती हा विवाहित असून तो गायनाचार्य व अध्यात्मिक क्षेत्रातला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like