Chikhali : नणंदेने वाहिनीला मारहाण करत घेतला चावा

एमपीसी न्यूज – तुझ्यामुळे माझी आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, असे म्हणत नणंदेने वाहिनीला मारहाण केली. तसेच हात, पाय आणि कानाला चावा घेत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी बारा वाजता ताम्हाणेवस्ती, चिखली (Chikhali)  येथे घडली.

 Gold Rates : आजचे सोने-चांदी भाव

याप्रकरणी जखमी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जखमी महिलेच्या नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या नणंदेने ‘माझी आई तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे’ असा गैरसमज करून घेत मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दोन्ही हाताला, उजव्या पायाला आणि डाव्या कानाला चावा घेत दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.