Pune : नरेंद्र मोदींची कार्यशैली चाणक्यनितीशी जुळणारी : अमित शहा

एमपीसी न्यूज – राजकीय नेत्यांचे रहाणीमान साधे असावे. सामान्य माणसांना सहज संपर्क करता येईल, अशी नेत्यांची जीवनशैली असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची जीवनशैली चाणक्यनितीशी जुळणारी असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘आर्य चाणक्य – जीवन और कार्य : आज के संदर्भ मे’ या विषयावर पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांच्या भूमीवर उपस्थित असल्याने मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो असे सांगत अमित शहा यांनी भाषणाला सुरवात केली. ते पुढे म्हणाले, राजा हा राज्याचा प्रथम सेवक आहे, याची सुरवात चाणक्यांनी केली.

राष्ट्र महान है, राजा महान नही, असे मत आर्य चाणक्य यांनी सर्वप्रथम व्यक्त केले. शिक्षक बनून सम्राट बनण्याचे काम आर्य चाणक्य यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.