Nashik Crime news : लाच स्वीकारताना पोलीस शिपाई ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसीन्यूज : मालेगाव शहरातील कर्तव्यावर असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील शिपायाला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. श्रावण किसान माळी, असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आयशानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील आरोपीला मदत करण्यासाठी तक्रारदाराच्या भावाकडून पाच हजारांच्या लाचेची मागणी पोलीस शिपाई काळे यांनी शुक्रवारी (दि २९) केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करून याबाबत माहिती दिली.

यानंतर संशयित पोलीस शिपाई हा बीट मार्शल असून रात्रपाळीत आपल्या ड्युटीदरम्यान लाचेची रक्कम शनिवारी (दि ३०) पहाटेच्या सुमारास स्वीकारली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस शिपायास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार एस भामरे, उज्वलकुमार व्ही. पाटील, अजय के. गरुड, किरण आर. अहिरराव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.