Nashik Crime News : नाशिक मुंबई महामार्गावर ट्रकचा अपघात; तीन जण ठार तर एक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे फाट्यानजिक आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रक मधील तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक कडून मुंबईकडे जाणारा ट्रक क्र.एम एच 15डी के.2355 हा तांदूळ घेऊन जात असताना वाडीवऱ्हे फाट्या जवळ पेट्रोल पंप समोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाच्या तारा तोडत मुंबई बाज़ुकड़ून नाशिककडे काचाचे तुकडे घेऊन येणाऱ्या आयशर क्र एमएच 04 जे यू 3986 या वाहनावर जाऊन अदळला.

_MPC_DIR_MPU_II

समोरासमोर हा अपघात झाल्याने तांदूळ घेऊन येणाऱ्या ट्रकचे अक्षरशः तुकडे झाले होते. त्यातील तांदळाचे कट्टे पडले होते, तर आयशर ट्रक मधील काचासुद्धा रस्त्यावर इतरत्र पसरल्या होत्या या अपघतात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या सर्वांना जगद्गुरु नरेन्द्र महाराज संस्थानच्या रुग्नवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविले .(अपघतात मृत झालेले 1 ) वीरेंद्र सिंग डुंगरसिंग परिहार,2)मोरपाल, 3)जितेंद्र यादव हे तिघे मृत झाले आहेत तर अस्लम खान हा आयशर ट्रकचा क्लीनर जखमी झाला आहे.)

या अपघतामुळे एका बाजुची वाहतूक खोळम्बली होती मात्र महामार्ग पोलीस आणि वाडीवऱ्हे पोलीस यांनी तत्काळ वाहतूक एकाच मार्गाने वळवली व खाजगी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही ट्रक बाजूला करण्यात आले.

याप्रकारणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.