-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nashik News : गरुडझेप प्रतिष्ठानच्या दृष्टीबाधित सागर बोडकेकडून लिंगाणा सर 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – नाशिकमधील गरुडझेप प्रतिष्ठानच्या दृष्टीबाधित सागर बोडके लिंगाणा सर करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. सागरने २०१९ साली २१ वेळा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून जागतिक विक्रम केला होता…

२०२० साली वझीर सुळका सर करून परत एकदा नवीन विक्रम रचला होता. यानंतर नुकताच त्याने दुर्गम लिंगाणा सर करून नवीन विक्रम रचला आहे. या मोहिमेत सखा सह्याद्री या संस्थेतर्फे डॉ. दत्तात्रय रोकडे यांनी सहकार्य केले तसेच टेक्निकल सपोर्ट म्हणून पॉइंट ब्रेक एडवेंचर नाशिक संस्था चे जॅकी साळुंखे सोबत होते.

लिंगाणा हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये बांधला. रायगडचा हा उपदुर्ग घाटावर पहारेसाठी , महाडपासून ईशान्येला 45 मैलावर पाने गावाजवळ आहे. त्याच्यावरील गुहेच्या वरचा आकार हा शिवलिंगासारखा आहे.तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे. पायथ्यापासून अर्ध्या तासात गुहे जवळ अवघड वाटेने गुहेजवळ जाता येते.

सागर सोबत एकूण 16 गिर्यारोहक आणि 3 टेक्निकल स्वयंसेवक होते. ठाण्यावरून रात्री 9 वाजता ते निघाले व सकाळी 4 वाजता लिंगाणा च्या पायथ्याच्या मोरणा गावात पोहोचले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

सकाळी 6 वाजता बोराट्याची नाळ उतरण्यास सुरुवात केली आणि 9.30 वाजता लिंगाण्याच्या बेस कॅम्पला पोहोचले. तेथे गिर्यारोहन आणि क्लाईमिंग ची इक्विपमेंट जुळवाजुळव करून रोप फिक्स करून क्लाइंबिंगला सुरुवात केली.

11:51 लिंगाण्याच्या टॉप वर सागर बोडके होता. डॉ रोकडे यांनी सागरला आजूबाजूचा परिसर सांगण्यास सुरुवात केली. रायलिंग पठार, रायगड, तोरणा, लांबवर दिसणारा राजगड, काळ नदीचे खोरे ,असे एकेक गोष्टी ते सांगत होते.

टीमच्या सपोर्ट मुळे अनेक अडचणीवर मात करून सुरक्षित रित्या आम्ही 7 वाजता सायंकाळी लिंगाण्याच्याच्या पायथ्याशी पोहोचलो.

पुन्हा दगड धोंड्याची बोराट्याची नाळ हे दिव्य आव्हान, डॉ.रोकडे, तुषार पोवळे यांच्या सततच्या मदतीने यशस्वी रित्या चढून वर 9.50 रात्री परत आले. त्यानंतर संस्थेतर्फे सर्टिफिकेट देण्यात आले. गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे यांनी सागरचे स्वागत व सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.