Police Training Institute : सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण संस्था म्हणून पुण्यातील महाराष्ट्र पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्राचा सन्मान

एमपीसी न्यूज : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करंडक विजेत्या पोलीस प्रशिक्षण संस्था घोषित करण्यात आल्या असून त्यामध्ये सन 2020-21 या वर्षासाठी अराजपत्रित अधिकारी या श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण संस्था म्हणून पुण्यात (Police Training Institute) आसलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र यांना राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी (दि.9) पोलिस अनुसंधान आणि विकास विभागाच्या 52 व्या स्थापना दिन समारंभात ही ट्रॉफी महाराष्ट्र पोलीस बिनतारी विभागास केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस विभागाचे वतीने पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक अपर पोलिस महासंचालक रितेश कुमार यांना प्रदान करण्यात आली.

Crime News : एटीएम सुरक्षा रक्षकाच्याच एटीएममधून  90 हजारांची चोरी

 

महाराष्ट्र पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र. हे महाराष्ट्र पोलिस दलाकरिता तांत्रिक प्रशिक्षणाचे एकमेव प्रशिक्षण केंद्र असून ते पोलीस बिनतारी मुख्यालय स्थित आहे.(Police Training Institute) पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्राची स्थापना सन 1967 मध्ये झाली असून 2016 पासून आजपर्यंत 4 हजार पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व अंमलदार यांना बिनतारी दळणवळण माहिती तंत्रज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित केले गेले आहेत.

महाराष्ट्र पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध संवर्गाच्या नवप्रवीष्ठ अधिकारी व जंगलदार यांना मुलभूत पाठवक्रम प्रशिक्षण (Police Training Institute) तसेच आगामी तंत्रज्ञान ई-गव्हर्नन्स अॅडव्हान्स सायबर कोर्स आणि रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स असे सेवांतर्गत प्रशिक्षण पोलिस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांना नियमितपणे दिले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.