Pimpri News : ‘नैसर्गिक ऑक्सिजन’ शुध्द हवा, समाजातील प्रत्येकाची गरज –  कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीत कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. हजारो निष्पाप लोकांचे जीव ऑक्सिजन अभावी गेले. या परस्थितीत शुध्द हवा आणि नैसर्गिक ऑक्सिजन समाजातील प्रत्येक घटकाला हवा आहे. समाजाची ही गरज ओळखून ‘O2 झोन’ कंपनीने ‘ऑक्सिजन’ देणा-या झाडांचे इनडोअर वृक्षारोपणांसह संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे नैसर्गिक ‘ऑक्सिजन’ घेवून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.      

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,  शेखर खंडागळे, सिध्दनाथ ठोकळे, सचिन वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.

नासा सारख्या संशोधन संस्थेने ऑक्सिजन देणा-या झाडांना मान्यता दिली आहे. त्या झाडांचा उपयोग करुन ‘O2 झोन’ कंपनीने इंडोर प्लॅटेशन करुन नैसर्गिक शुध्द हवा आणि ‘ऑक्सिजन’ मिळणार आहे. ही झाडे आपण घर, ऑफिस, बॅंक, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणे झाडांची लागवड करण्यात येईल. या झाडांची संपुर्ण देखभाल ही कंपनी करणार आहे. विशेषता यापुर्वीची घरामधील हवा आणि झाडांच्या लागवडीनंतर मिळणारी शुध्द हवा, याविषयी कंपनी तपासणी अहवाल देणार आहे. तसेच या कंपनीच्या माध्यमातून आपण लोकांना लागणारा ऑक्सिजन, स्वच्छ हवा, याविषयी संपुर्ण माहिती देवून इनडोअर प्लॅटेशन कसे करावे, याकरिता आम्ही काम करणारआहोत.

देशासह राज्यात नासाने मान्य केलेल्या ऑक्सिजन देणा-याझाडांचे वृक्षारोपण व संगोपन करणारी ही एकमेव कंपनी आहे. इनडोअर प्लॅटेशन करुन प्रत्येक झाडांची ओळख, ते झाड कुठे लावायचे, त्याची निगा कशी ठेवायची, याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहे. सध्यस्थिती ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आपण नैसर्गिक व शुध्द हवा तयार करण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.