Bhosari Crime News : थायलंड देशातील कंपनीत भागिदारीचे आमिष, 22 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज – थायलंड देशातील कंपनीत भागिदारी देऊन मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत 22 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत भोसरी परिसरात हा प्रकार घडला. 

होमिन जसुभाई खोखर (रा. गुजरात) व दिव्यांग कानुभाई डोबारीया (रा. गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत प्रभुदास ठक्कर (वय 54, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी रविवारी (दि.30) भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी चंद्रकांत यांना थायलंड देशातील थाई ॲक्वा कंपनीत भागिदारी देऊन मोठ्या नफ्याचे आमिष दिले. फिर्यादी यांनी कंपनीत 22 लाख रुपये गुंतवले मात्र, याबाबत गुंतवणूकीचा हिशोब न देता कंपनी बंद केली. व गुजरात मध्ये जाऊन दुसरी कंपनी स्थापन केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.