Petrol Price Hike : पुण्यात पेट्रोलची ‘सेंच्युरी’, डिझेल नव्वदीपार 

एमपीसी न्यूज – देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हायलचे नाव घेत नाहीत. पुण्यात आज पेट्रोलने ‘सेंच्युरी’ पार केली तर, डिझेलचे दर नव्वदीपार गेले आहेत. पुण्यात आज (सोमवारी) पेट्रोल 100.15, डिझेल 90.71 रुपये दर नोंदवले गेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदाच पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. 

पुण्यात इंधनाचे दर साधं पेट्रोल 100.15 रु, डिझेल 90.71 रु, पॉवर पेट्रोल 103.83 रु तर, सीएनजी 55.50 रु असे नोंदवले गेले. तसेच, पिंपरी चिंचवड मध्ये साधं पेट्रोल 100.38 रु, डिझेल 90.94 रु, पॉवर पेट्रोल 104.36 रु असे नोंदवले आहेत.

ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल, डिझेलचे दर कमी व्हायचे असतील तर राज्य, आणि केंद्र सरकारने कर कमी करावेत. दारुवाला यांच्या मते पेट्रोलच्या दराचे विभाजन केले तर ते खालील प्रमाणे असेल.

मूळ किंमत – Rs 36.11

एक्साईज ड्युटी – Rs 32.90

राज्य व्हॅट – Rs 17.25

राज्य सेस – Rs 10.12

डिलर मार्जिन – Rs 3.07

वाहतूक आणि इतर खर्च – 0.70

पेट्रोलची एकूण किंमत – 100.15

आणि डिझेल दर

मूळ किंमत – Rs 38.55

एक्साईज ड्युटी – Rs 31.80

राज्य व्हॅट – Rs 14.78

राज्य सेस – Rs 3.00

डिलर मार्जिन – Rs 2.58

डिझेलची एकूण किंमत – Rs 90.71

‘वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. लॉकडाऊन मुळे बेरोजगारी वाढली असून, आर्थिक चणचण भासत असताना पेट्रोल दराची शंभरी न परवडणारी आणि धक्कादायक आहे.’ – प्रशांत शिंदे (बेरोजगार तरुण, चिंचवड)

‘केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य नागरिकांचा विचार न करता केलेली इंधनवाढ मागे घ्यावी. दीड वर्षात लॉकडाऊन मुळे अगोदरच बेरोजगार आणि उपासमारीची वेळ आली असताना अवाढव्य इंधन दर गरिबाला रसातळाला घेऊन जाणारी आहे. इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस प्रयत्न करायला हवेत.’ – आकाश गायकवाड (नोकरदार, चिंचवड)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.