Navneet Rana : राणा दाम्पत्यांनी दिले सत्र न्यायालयाला ‘हे’ उत्तर

एमपीसी न्यूज : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य सध्या अटकेत आहे. त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. परंतु, त्यांनी न्यायालयाच्या अटींचा भंग केल्याचे कारण देत सरकारी वकिलांनी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांकडे जामीन का द्यावा? असे उत्तर मागितले होते. यावर आज राणा दाम्पत्यानी उत्तर दिले आहे. आपल्या याचिकेत त्यांनी म्हंटले आहे, की आम्ही कोणत्याही अटींचा भंग केला नाही. त्यामुळे आम्हाला जामीन द्यावा. आम्ही माध्यमांसमोर कैदेत घालवलेल्या दिवसांबद्दल सांगितले आहे. आम्हाला कशाप्रकारे वागणूक देण्यात आली याची माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारे अटींचे उल्लंघन केले नाही. या केसबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारे मत व्यक्त केले नाही. त्यामुळे आम्हाला जामीन मिळावा असे आपल्या उत्तरात म्हंटले आहे.

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासह निवडणूकीला मध्य प्रदेशला परवानगी;सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

या प्रकरणाची सुनावणी आता 15 जून रोजी होणार आहे. राणा दाम्पत्याने (Navneet Rana) यावेळी कोर्टात सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीचा अर्ज दाखल केला. कोर्टाने राणा दाम्पत्याचा सुनावणीस अनुपस्थित राहण्याचा अर्ज मंजूर केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.