Sports News : नॉईजी बॉईजच्या मोठ्या विजयात आयुज भुतेचे सहा गोल

एमपीसी न्यूज – नॉईजी बॉईज आणि एफसी महाराष्ट्र संघांनी पीडीएफएच्या फुटबॉल लीगमध्ये द्वितीय श्रेणीत सहज विजयाची नोंद करत आपली आगेकूच कायम राखली. दरम्यान, क्रीडा प्रबोधिनी आणि मॅथ्यू एफए संघांनी १६ वर्षांखालील युवा लीगमध्ये मोठ्या विजयाची नोंद केली. 

 

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यात आयुज भुते याने सहा गोल नोंदवत नॉईजी बॉईज संघाचा मोठा विजय साकार केला. त्यांनी जुन्नर तालुका संघाचा ९-० असा धुव्वा उडवला. ई गटातील या लढतीत आयुजने १५व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि त्यानंतर २२, २५, २९, ४५ आणि ४७व्या मिनिटाला गोल केले. योगेश लोढने दोन, तर दिनेश राठोडने एक गोल केला.

 

एच गटातील सामन्यात पिछाडीवरून मुसंडी मारताना एफसी महाराष्ट्र संघाने रियल पुणे युनायटेडचा ३ – १ असा पराभव केला. अविनाश पांडव याने १२व्या मिनिटाला गोल करून रियल पुणे संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर जेफ्री परेरा याने २३व्या, शेरी किशोर याने २५व्या आणि अभिजित शिंदे याने ४३व्या मिनिटाला गोल करून एफसी महाराष्ट्राचा विजय साकार केला.

 

एसएसपीएमस मैदानावरील १६ वर्षांखालील गटाच्या सामन्यात ब गटात क्रीडा प्रबोधिनी संगाने बार्सा अकादमीचा ६-० असा पराभव केला. साई पाटिल याने २३ आणि ५३व्या मिनिटाला गोल केले. आरव भारद्वाज याने २६, जॉय शेळकेने ३० आणि मोहित फडकेने ३६व्या मिनिटाला गोल करून संघाचे गोलाधिक्य वाढवले.

 

सी गटातील सामन्यात मॅथ्यू एफए संघाने रायन एफए संघाचा ६-० अशाच फरकाने पराभव केला. त्यांच्याकडून जनित नायडू (१५वे), उमर खान (२७, २९वे मिनिट), यांनी गोल केल्यावर यश देढे याने ३१, ३३ आणि ४२व्या मिनिटाला गोल करून मॅथ्यू एफएच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

निकाल –
एसएसपीएमएस मैदान – ब गट
 क्रीडा प्रबोधिनी ६ (साई पाटिल २४, ५३वे मिनिट, आरव भारद्वाज २६वे, जॉय शेळके ३०वे आणि मोहित फडके ३६वे मिनिट) वि.वि.
बार्सा अकादमी ०
ग्रीनबॉक्स चेतक के (पुढे चाल) वि.  केशव माधन प्रतिष्ठान

 

सी गट –
मॅथ्यू एफए ६ (जतिन नायडू १५वे, उमेर खान २७, २९वे मिनिट, यश देठे ३१, ३३, ४२वे मिनिट) वि. वि. रायन एफए ०
उत्कर्ष क्रीडा मंट १० (अनिकेत अवघडे ५,७,१२वे मिनिट, निलेश दरे ३२वे, अभय निजामकर ३८, ५२, ५५वे मिनिट, सुमेध जाधव ५०वे, अनिकेत सिंग ५७, ५९वे मिनिट) वि.वि. लायन्स अकादमी ०

 

द्वितीय श्रेणी –
अ गट -दिएगो ज्युनियअर्स ० बरोबरी वि. डेक्कन इलेव्हन सी ०

 

सप महाविद्यालय मैदान – ई गट -स तृतिय श्रेणी
नॉईजी बॉईज ९ (आयुज भुते १५,२२, २५, २९, ४५, ४७वे मिनिट, योगेश लोढ ३४, ३६वे, दिनेश राठोड ४१वे मिनिट) वि.वि.जुन्नर
तालुका ०
एफ गट – पुणे वॉरियर्स २ (महाराणा रानडे २८वे, पियुष कुलकर्णी ५८वे मिनिट) वि.वि. गोल्डन फेदर ०
जी गट – दुर्गा एसए ० बरोबरी वि. सिटी एफसी पुणे ०
कमांडोज ब १ (मानव सहेरिया) बरोबरी वि. ईगल एफसी १ (रन्साई राज ब्रह्मा ४८वे मिनिट)

 

एच गट – एफसी महाराष्ट्र ३ (जेफ्री परेरा २३वे, श्रेय किशोर २५वे, अभिजित शिंदे ४३वे मिनिट) वि.वि. रियल पुणे युनायटेड बी १ (अविनाश पांडव १२वे मिनिट)

 

डी गट – बेटा अ २ (प्रल्हाद ठाकूर १७वे, ४५वे मिनिट) वि.वि. इनव्हेडर्स  ०
लिजेंडस एफए १ (कार्तिक कांबळे ५८वे मिनिट) बरोबरी वि. इन्फंटस १ (राजू वावरे १३वे मिनिट),
इंद्रायणी एससी ब (पुढे चाल) वि. पूना सोशल क्लब

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.