Sharad Pawar On Sushant Case: ‘दाभोलकर हत्येच्या चौकशीसारखी सुशांत प्रकरणाची स्थिती होऊ नये’

महाराष्ट्र सरकार चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयला देण्याचा निकाल बुधवारी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकार चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीचे निराकरण अद्याप झालेले नाही. या चौकशीप्रमाणेच सुशांतसिंह यांच्या तपासकार्याची परिणती होऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.  डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या चौकशीचा दाखल देत शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या सीबीआयवर निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करुन या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.