New Delhi: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना आपापल्या राज्यात परतता येणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यात स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक अडकून पडले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थी, मजुरांचा घरी जाण्यासाठी उद्रेक सुरू झालेला. त्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्राच्या निर्णयानुसार स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना आपापल्या राज्यात परतता येणार आहे. यासाठी त्या-त्या राज्य सरकारने मदत करावी, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक यांची विशेष नोंदणी करून आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करून त्यांना आपापल्या राज्यात रवानगी करण्यात यावी, असे निर्देश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

दरम्यान, यासाठी बसने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच दोन्ही ठिकाणी या स्थलांतरित लोकांची चाचणी केली जाणार असून वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांचे होम किंवा संस्थात्मक क्वारंटाईन केले जाणार आहे. या लोकांची दोन्ही ठिकाणी चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.