New Delhi: संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढविणार – निर्मला सीतारामन

New Delhi: Foreign investment in defense sector to increase from 49 per cent to 74 per cent: Nirmala Sitharaman

एमपीसी न्यूज – सरंक्षण क्षेत्र ‘स्वावलंबी’ करण्यावर केंद्र शासन भर देणार आहे. संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. संरक्षण उत्पादनातील परदेशी गुंतवणूक मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती सरंक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांचे खासगीकरण नव्हे तर कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. सरंक्षण क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा आज करण्यात आल्या.

कोळसा उत्पादन वाढविण्यासाठी खासगी कंपन्यांना गुंतवणुकीची परवानगी

कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खाणकाम होईल आणि सरकारची मक्तेदारी संपणार आहे. कोळसा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता कशी निर्माण करावी आणि कमी आयात कशी करावी, यावर भर दिला जाणार आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. जास्तीत जास्त खाणकाम होऊ शकेल आणि देशातील उद्योगांना चालना मिळेल. कोळशाच्या नवीन 50 खाणी लिलावासाठी उपलब्ध असतील. पात्रतेच्या कोणत्याही प्रमुख अटी असणार नाहीत. कोल इंडिया लिमिटेडच्या खाणी खासगी क्षेत्रालाही देण्यात येतील, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या चौथ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या घोषणा  

  • देशातील सहा विमानतळ पीपीपी तत्त्वावर विकसित करणार
  • काही शस्त्रांच्या आयातीवर बंदी, भारत स्वतःच ती शस्त्रे बनविणार
  • संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 49 टक्क्यांवरून थेट 74 टक्क्यांपर्यंत वाढविणार
  • शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन (निगमीकरण) केले जाईल.
  • शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांचे खासगीकरण होणार नाही.
  • संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्यावर भर, संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ अत्यावश्यक
  • कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना परवानगी देणार, शासनाचा एकाधिकार संपणार
  • कोळशाच्या व्यावसायिक उत्पादनावर भर 
  • 50 नव्या कोळसा खाणींचा लिलाव होणार आणि त्यासाठीचे नियमही सुलभ ठेवणार
  • फक्त गरजे इतकाच कोळसा आयात केला जावा हा सरकारचा प्रयत्न आहे. 
  • कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणार.
  • कोळसा उत्पादन क्षेत्रासाठी 15 हजार कोटी रुपयांची  घोषणा.
  • कोळसा उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार
  • आत्मनिर्भर भारत पॅकेजनुसार गुंतवणूक आणि रोजगार वाढीला प्राधान्य देणार
  • अंतरिक्ष संशोधनासाठी तरतूद
  • कोळसा, संरक्षण उत्पादन, नागरी उड्डाण क्षेत्रासाठी आज घोषणा 
  • मोठ्या सुधारणा करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर 
  • आज आठ क्षेत्रांसाठी मदतीची घोषणा होणार
  • देशात उत्पादन व देशासाठी उत्पादन करायचं आहे.
  • गुंतवणूक वाढविणाऱ्या राज्यांचे रँकिंग केले जाणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.