Vadagon : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने रमजान निमित्त मुस्लिम बांधवाना फळ वाटप

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी  काँग्रेस मावळ तालुका अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आज वडगाव मावळ येथे अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आफताब सय्यद यांच्या नेतृत्वाखाली  रोजा इफ्तार निमित्त मावळ तालुक्यातील मुस्लिम बांधवाना फळांचे वाटप  करण्यात आले.  

या वेळी मावळ तालुक्याचे  आमदार सुनिल शेळके यांनी मुस्लिम बांधवांना येणा-या  रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या व कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर या वेळेस   ईद साजरी करताना काळजी घेण्याच्या सुचना केल्या.

 राष्ट्रवादी  काँग्रेस तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी  लॉकडाऊनमुळे परिस्थिति गंभीर असल्याचे सांगत समाजातील गरजु मुस्लिम कुटुंबांना होईल त्या पद्धतीने इतर मुस्लिम बांधवांनी मदत करुन ईद साजरी करण्याची विनंती केली.

 या प्रसंगी  पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगावचे  नगरसेवक किशोर भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत,   जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहिले, सुनिल शिंदे, भाऊसाहेब ढोरे, सोमनाथ धोंगडे व तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व  पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

 राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष  आरिफ तांबोळी,  युवा विभाग अध्यक्ष आयाज शेख, उपाध्यक्ष मावळ जमीर शेख, देहूरोड अध्यक्ष शंकर स्वामी, उपाध्यक्ष मावळ रिजवाण खान,  लोणावळा शहर अध्यक्ष वसिम शेख, उपाध्यक्ष लोणावळा अब्दुल पारेख, फरहाद शेख, मोहसिन शेख, इजमाम सय्यद, शाहरूख शेख, राहिल तांबोळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.