New Delhi : खासदार निधी दोन वर्षांसाठी स्थगित; वेतनातही ३० टक्के कपात

एमपीसी न्यूज : कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाच्या लढाईसाठी खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यात  येणार  असून, त्यांचा खासदार निधी दोन वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदारांच्या वेतनातून कपात केलेला निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षांसाठी स्थगित केलेला खासदार निधीही याच कामासाठी वापरण्यात येणार आहे.

या निर्णयाबाबत अध्यादेश काढण्यात येईल. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.