Maharashtra Lockdown : लॉकडाऊन मध्ये सार्वजनिक व खासगी वाहतूकीबाबत ‘हे’ शासनाचे नवे नियम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहतील. नव्या नियमांना राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ असे नाव दिले आहे.

शासनाच्या नव्या नियमानुसार, राज्यात सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.

सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.

बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.