BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : पैशांच्या वादातून एकाची 30 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने नेली

एमपीसी न्यूज – दुचाकीला मोटार अडवी लावून पैशांच्या वादातून दुचाकीस्वाराला खाली ओढत त्याच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी, पेंडल जबरदस्तीने काढून घेतले. त्याचे दोन मोबाईल जमिनीवर आदळून नुकसान केले. ही घटना रावेत येथील भोंडवे पंपाजवळ येथे नुकतीच घडली.

याप्रकरणी संतोष शंकर ठाकूर (वय-43, रा. आदर्शनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय नवले, सुनिता विजय नवले (रा. शिंदेवस्ती, रावेत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर व आरोपी यांच्यात पैशांचा वाद आहे. याच वादातून 21 सप्टेंबर रोजी आरोपीने ठाकूर यांच्या दुचाकीला मोटार आडवी लावून त्यांना थांबविले. ठाकूर यांना दुचाकीवरून आली ओढून पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने आरोपी विजय याने ठाकूर यांच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन, पेंडल जबरदस्तीने काढून घेतले. आरोपी सुनिताने त्यांच्या खिशातील दोन मोबाईल जमिनीवर आदळून नुकसान केले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3