Pune : आनंद विद्यानिकेतनमध्ये ‘अनाथ मुलांच्या व्यथा’ विषयांतर्गत वक्तृत्व स्पर्धा

एमपीसी न्यूज – आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर व इनरव्हिल क्लब रिवरसाईड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनाथ मुलांच्या व्यथा’ या अंतर्गत एका छान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आपल्या प्रशालेत
वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छान मनोगते व्यक्त केली.

यामध्ये प्रथम क्रमांक मोनिका ससाने इ.9 वी. द्वितीय क्रमांक महानूर शेख इ.5वी. व तृतीय क्रमांक स्वाती कोळी इ.10 वी. तसेच उत्तेजनार्थ रूपाली कांबळे व सुश्मिता सोनटक्के यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
यावेळी इनर व्हिल क्लबच्या सुमन मर्चंट यांनी क्लब अनाथ मुलांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संतोष थोरात सरांनी अनाथ मुलांच्या व्यथा व अनाथ मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या संस्था विषयी माहिती दिली.

यावेळी क्लबच्या अध्यक्षा आशा आगरवाल मित्तल, शशी आगरवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पवार यांनी केले व आभार मुक्ता कोरपे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक घोगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण मासाळ सर, विलास शिंदे सर अनिल ढेकळे सर, उज्ज्वला पाटील व बीराजदार मॅडम यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.